Powered By Blogger

Sunday, February 15, 2015

आइडिया की कल्पना

आजकल टीवी  पर आइडिया की इन्टरनेट की सुविधा के बारे में विज्ञापन चल रहे हैं । इन विज्ञापनों में भारत के विभिन्न क्षेत्रों में महिलाओं, युवाओं, तथा अन्य लोगों को जो अनुचित प्रथाओं और रिवाजों के चलते शिक्षा लेने के अधिकार से वंचित रहते हैं, उन्हें कैसे आइडिया इन्टरनेट के माध्यम से शिक्षा पाना संभव है यह दिखाया जा रहा है। विज्ञापन कर्ताओं की कल्पना की दाद देनी होगी, उन्होंने इन अनुचित प्रथाओं तथा रिवाजों का उपयोग अपने विज्ञापनों में बहुत ही अच्छे तरीके से किया है।

विज्ञापन के माध्यम से पहले भी समाज में व्याप्त बुराइयों पर कटाक्ष करने का सफल प्रयास किया जा चुका है, सवाल यह है की  क्या हमारे समाज के समक्ष आने वाली इन बुराइयों को दूर करने के प्रयास हम करने वाले हैं या नहीं? आज जब इन्टरनेट और स्मार्टफोन जैसी तकनीकों की वजह से  सामाजिक अभिसरण बढा है, हम सबकी  यह  जिम्मेदारी बनती है कि  समाज के उस तबके तक शिक्षा जैसे मौलिक अधिकारों को लेकर जाए।

Thursday, September 29, 2011

रंग माणसांचे.....

नवरात्रीचे दिवस सुरु झाले आहेत. रोज निरनिराळ्या रंगाच्या कपड्यामध्ये वावरणाऱ्या ललना आजकाल, ठरवून एकाच रंगाचे कपडे परिधान करून ऑफिसला कार्यक्रमाना जाऊ लागल्या आहेत. या सगळ्या नवरात्रीच्या भारलेल्या वातावरणात एक वेगळीच एकात्मता दिसू लागली आहे. नवदुर्गा जणू रोज नवनवीन रंगात वावरताना दिसता आहेत. आज पिवळ्या रंगाच्या साड्या, ड्रेस घालून वावरणाऱ्या सगळ्यांना पाहून एक गोष्ट लक्षात आली पिवळा रंग म्हटला तरी प्रत्येकाच्या वस्त्राची रंग छटा वेगळीच होती कि. रंग तोच पण त्यातल्या रंग घटकांचे प्रमाण थोडे कमी जास्त झाले कि लगेच छटा बदलेली.. काहींचे ड्रेस, साड्या वेगवेगळया नक्षी कामाने तर काहींची वस्त्रे वेगळ्या रंगाचा वापर त्या पिवळ्या पाश्वभूमी वर करून सुशोभित केलेली. 

खरे तर पिवळा रंग म्हटला तर, एक विशिष्ट रंग छटा मनचक्षु समोर उभी राहते... पण प्रत्येक्षात प्रत्येक ठिकाणी वेगळी रंग छटा समोर येते.. मग खरा रंग कोणता? रंगातल्या घटकांचे प्रमाण कणभरही कमी जास्त झाले तरी बदलणारा रंग अगदी मूळ रंगातले पाण्याचे प्रमाणही कमी जास्त झाले तरी आपली छटा बदलतो. तसाच इतर रंगाचे बेमालूम मिश्रणही रंगाची छटा बदलते.  या रंगाच्या गुणधर्म सारखेच माणसांचे आहे ना...

दोन हात, दोन पाय, दोन डोळे.....एक मेंदू, एक हृदय आणि नसानसातून वाहणारे रक्तही एकाच रंगाचे.... असे असूनही प्रत्येक माणसाच्या स्वभाव आणि व्यक्तीमत्वाची छटा वेगळीच दिसते.
सख्खे भाऊ-बहिणी, जिवलग मित्र एवढंच काय जुळे म्हणून जन्माला आलेली मुलेही वेगवेगळया स्वभावाची आणि व्यक्तीमत्वाची असतात. असे का? 

याचे उत्तर या रंगाच्या बाबतीत आहे तसेच फरक एवढंच, त्यात रंग घटक आहेत तर माणसांच्या बाबतीत त्यांना घडवणारे शिक्षण, घरातले संस्कार, सामाजिक संस्कार, कामक्रोध मद मत्सर आणि माया या षड्रीपुंचा त्याच्या मनावर पडणारा प्रभाव असावा. हा प्रभाव त्यांच्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्वाला वेगवेगळया छटा देत असावा.  

आपण आपल्या आयुष्यात या रंगाचा उपयोग करताना अनेकदा विरोधाभासी रंग संगतीला प्राधान्य देतो. आपल्याला विरोधाभासी रंगसंगती भावते. आपण ती मनापासून स्वीकारतो. मग माणसाच्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या या घटकांचा विचार करून, त्याच्या बदलणाऱ्या स्वभाव छटा मग त्या विरोधाभासी असल्या तरी त्या स्वीकारण्यास का मागे पुढे पाहतो. आपल्या स्वतःच्या व्याक्तीमत्वातही अशाच स्वभावातील बदलत्या छटा दिसत असतात ना? 

प्रत्येकाच्या आयुष्यात हा रंग बदलाचा खेळ सुरूच असतो.. जसे प्रमाण कमी जास्त होते त्यात बदल होतो, राग  आला तर क्षणापूर्वी रक्तवर्णी असलेला माणूस... आनंदी झाला तर त्यांच्या चेहऱ्याची रंग छटाही बदलते.. म्हणून परिस्थितीनुरूप बदलणाऱ्या या रंग छटा आपल्या मनाप्रमाणे कधी असतील कधी नसतीलही... आज आवडणारी छटा उद्या आवडेलही... निश्चित सांगता येत नाही कारण... आपल्या स्वभाव छटा अशाच बदलत राहणार आहेत.. म्हणून विरोधाभास असला तरी तो आपण स्वीकारला पाहिजे.. त्यातच आपले व्यक्तिमत्व अधिक उठून दिसते...

Saturday, June 18, 2011

भांडण

भांडण मग ते लहान असो कि मोठे ते त्रासदायकच असते. खरे सांगायचे तर ९९% भांडणे हि भांडणे नसतातच फक्त गैरसमजातून वाढलेली बोलाचाली असते ती आणि अशा बोलाचालीचे चे अवडंबर करून लोक टोकाचे निर्णय घ्यायला निघतात. 

काही वेळा समोरच्या व्यक्तीचे बोलणे अपूर्ण ऐकून, कधी अर्थाचे अनर्थ घेऊन, पूर्वग्रह मनात ठेवून आपण आपलेच गैरसमज वाढवत राहतो, अमुक एका  परिस्थितीत हि व्यक्ती अशीच वागेल, किंवा एखादी गोष्ट करताना आपणच समोरच्याच्या हेतून विषयी आडाखे बांधतो आणि स्फोटक प्रतिक्रिया देऊन मोकळे होतो. परिणामी जिथे वादविवादाला जागा नसते तिथेच वादविवाद सुरु होतो.

अशा प्रसंगांकडे आपण थोडे तटस्थपणे पहिले, समोरच्याची भूमिका समजावून घेऊन, मग शांतपणे आपली  प्रतिक्रिया दिली, आपली मते मांडली तर....वादविवाद टळू शकतात, काही विधाने हसण्यावारी घेऊन विनोद समजून दुर्लक्षित केली तरीही खुपदा आपण संवादाला चांगले वळण देवू शकतो. 

कितीही काहीही झाले तरी मनाचा तोल ढळू न देता, चर्चेला योग्य दिशेने समंजस शब्दात, साखर पेरत पुढे नेता येवू शकते, दोष सगळ्यांमध्ये असतात आणि आपण नाती जोडताना ती चांगल्या वाईट गुणांसह स्वीकारलेली असतात, मग पुन्हा त्याच्या नावाने वाद घालणे योग्य नाही. परिस्थितीनुरूप माणूस आपल्यातल्या वाईट गुणांना दूर सारून चांगले वागण्याचा प्रयत्न करतो आपण फक्त संयम ठेवून त्याला तेवढा वेळ दिला पाहिजे. आपण आपल्यातल्या दुर्गुणांना दूर सारण्या साठी वेळ मागतो, तसा तो समोरच्याला का देवू नये? 

आयुष्य हे खूप लहान आहे, आणि आपल्या सहवासातल्या प्रत्येकाला देण्या साठी आपल्या जवळ वेळही कमी आहे. हा छोटासा काळ प्रत्येकाशी छान आणि गोड बोलण्यासाठी वापरला तर.... अनेकदा ज्या गोष्टी कुठल्याच प्रयत्नाने साध्य होत नाही, त्या गोड बोलून साध्य करता येतात फक्त आपल्या मनाची तयारी हवी, आपण कोणाचही मन दुखावले नाही तर आपलेही मन दुखवणे कोणालाही शक्य होणार नाही.
हसतमुख माणसाच्या चेहऱ्यावरचे हसू कोणी हिरावून घेवू शकत नाही, 

आता आपण ठरवायचे हसतमुख व्हायचे कि रडतराउत?